लातूर: यशवंतराव चव्हाण संकुलातील फायर स्टेशन हटवून त्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले. हे फायर स्टेशन मनपाच्या प्रांगणात थाटण्यात आले. या स्टेशनचे कार्यालय एका तंबूत चालते. इथल्या कर्मचार्यांनी अख्खा उन्हाळा तंबूत काढला. आता पावसाळा कसा काढणार हा प्रश्न आहे. मोठा वारा आला तर तंबू उडून जाईल. मोठा पाऊस आला तर वाहूनही जाईल. एका शिफ्टला एका गाडीवर किमान सहा कर्मचार्यांची आवश्यकता असते. वास्तविक दोन, तीन, चार लोक असतात. आणीबाणीच्या प्रसंगी धावाधाव करावी लागते. दुसर्या स्टेशनवरुन कर्मचारी मागवावे लागतात. या कर्मचार्यांचे वेतनही तीन तीन महिने अडलेले असते. सफाई कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारी या सर्वांना मनपा समान ‘न्याय’ देते.....
Comments