लातूर: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्याच्या आलेल्या निकालातील मतमोजणीत तफावत असल्याने इव्हीएमची प्रक्रिया बंद करुन बॅलेट पेपर सुरु करावा या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाकडून लातुरच्या तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. घंटानादही करण्यात आला. ‘इव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाव’ हा नारा घेवून आंदोलन सुरु ४८ लोकसभा क्षेत्रातील इव्हीएम मशीन पैकी २६ ठिकाणच्या इव्हीएम मशिन मध्ये तफावत असल्याने येत्या काळात इव्हीएम मशिन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी केली आहे. यावेळी जितेंद सातपुते, नितीन गायकवाड, सरफराज पठाण, आनंद सूर्यवंशी, वृशाली सूर्यवंशी, प्रवीण सुरवसे, पवन सेलूकर, राजेंद्र सोनकांबळे, जीतेंद्र वाघचौरे, शिवाजी कांबळे, कुलदीप कांबळे, गौतम उजेडकर, रोहित साबळे, प्रमोद आडसुळे, विशाल गायकवाड, निलेश बनसोडे, विशाल वाहुळे, प्रतिक आल्टे, निखिल उड्डाणसिंह यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments