लातूर: सुट्यांचा भरपूर आनंद घेतल्यानंतर आज शाळेचा पहिला दिवस उजाडला. विद्यार्थ्यांसह पालकही उत्साहात होते. नवं दप्तर, नवा गणवेश, नवी पुस्तकं, नव्या वह्या सग्ळं काही नवं नवं. बालकांनी शाळेचा पहिला दिवस आनंदाने साजरा केला. अनेक शाळातून पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. अनेक ठिकाणी मुलांना मिठाई, फुलं देण्यात आली. काही नवी मुलं मात्र पालकांचा हात सोडायला तयार नव्हती. शिक्षक, पालकांनी गोड बोलून, समजूत काढून त्यांना वर्गात बसवलं....
Comments