HOME   व्हिडिओ न्यूज

दीपक सूळ खड्ड्यात! कॉंग्रेसजनांचं अंबाजोगाई मार्गावर आंदोलन

मणक्या्च्या उपचारासाठी हवेत ५५ हजार, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी लवकर पाठवावेत!


लातूर: अंबाजोगाई मार्गावरील मोठ्या खड्ड्यात विरोधी पक्षनेते दीपक सूळ बसून राहिले, बाकीचे कार्यकर्ते नेते सरकारचा निषेध करीत राहिले. १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती, मात्र तसं काही झालं नाही. त्याचा आज तीव्र निषेध करण्यात आला. १५ नंतर खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी घोषणा बांधकाम मंत्र्यांनी केली होती. दीपक सुळांनी पंचावन्न खड्डे मोजले, त्यात त्यांच्या मणक्याचा आजार बळावला. आता पंचावन्न हजार रुअप्ये द्या मला दवाखान्यात जायचंय असा उपहास त्यांनी केला. लातुरच्या या मार्गावरुन वाहने हाकणार्‍यांना मणक्याचे आजार होऊ शकतात त्याला कोण जबाबदार असा प्रश्न सूळ यांनी केला.
हे आंदोलन शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांच्या नेतृत्वाखाली झाले. हे रस्ते तर कॉंग्रेसच्याच काळात झाले मग तुम्ही आंदोलन कसे काय करता? असा प्रश्न विचारला असता सगळे रस्ते कॉंग्रेसच्याच काळात झाले पण खड्डे भाजपच्या काळात पडले. भाजप शासनाने एक किलोमीटरचाही रस्ता बांधला नाही. भाजप सरकार आणि बांधकाम मंत्र्यांनी फसवणूक केली आहे. आम्ही बांधलेले रस्ते यांना नीट ठेवतासुद्धा आले नाहीत असा आरोप कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी केला.
लातूर शहराच्या भोवताली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खड्ड्यांचे राज्य आहे. जिल्ह्यात सगळ्याच तालुक्यात हीच अवस्था आहे. या सगळ्याचा क्लेम बांधकाम मंत्र्यांनी द्यायला हवा. हे सरकार खोटी स्वप्ने दाखवते, खोटी आश्वासने देते. राज्य सरकार रस्ते बांधू शकत नाही. पण या रस्त्यावरचे खड्डे बुजवूही शकत नाहीत, आमच्या काळात मंजूर झालेल्या रस्त्यांचं श्रेय नितीन गडकरी घेतात असा आरोप स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी केला. यावेळी सचिन बंडापल्ले, सपना किसवे, किशोर राजुरे, कैलास कांबळे, सचिन मस्के, युनूस मोमीन, स्मिता खानापुरे, दत्ता मस्के, पृथ्वीराज शिरसाट, महेश काळे, गौरव काथवटे, संजय ओहळ, शंकर गुट्टे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top