HOME   व्हिडिओ न्यूज

झुंडशाहीच्या निषेधार्थ पानगावात धरणे-निदर्शने

मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा लागू करावा- मागणी


पानगाव : झारखंड राज्यातील एका २४ वर्षीय तरूणाची निर्घृणपणे हत्या केल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंटच्या वतीने राज्यभर एक दिवसीय धरणे प्रदर्शनाचे आव्हान करण्यात आले होते. त्याअंतर्गत पानगाव येथे सकल मुस्लिम बहुजन समाजाच्या वतीने झुंडशाहीच्या निषेधार्थ व झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा लागू करावा या मागणीसाठी पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षापासून देशभरामध्ये काही उन्मादी वृत्तीच्या लोकांनी धुमाकूळ घालून सर्वसामान्य नागरिकांचे बळी घेण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत अनेकांचा बळी या झुंडशाहीने घेतला. १७ जून रोजी झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी या तरूणाला बेदमपणे मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा देशभरामध्ये तिव्र निषेध होत आहे. दोषी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासह झारखंड येथील तबरेज अन्सारीच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक केली जावी व त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जावी तसेच तबरेजला रुग्णालयात घेऊन जाण्यास विलंब करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जावी, तबरेज अन्सारीच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक सहाय्य दिले जावे, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी सेवेत समावून घेतले जावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आणि झुंडबळीला गांभीर्याने घेत केंद्र शासनाने तात्काळ त्यांच्या विरोधी सक्षम कायदा तयार करावा, आतापर्यंत ज्या हुंडाबळीच्या घटना झालेल्या आहेत त्यातील पिडितांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. त्यामुळे झुंडबडीच्या प्रत्येक खटल्यास विशेष सरकारी वकील नेमला जावा. खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे. ज्या पद्धतीने झुंडीने मिळून मुस्लिम तरुणाच्या हत्या केल्या जात आहेत त्यामागील प्रमुख कारण आहे कट्टरतावादी विचारसरणी ते कट्टरतावादी विचार पोसणार्‍या आणि पेरणाऱ्या संघटनांना आळा घातला जावा या मागण्यासाठी नमाजपठण झाल्यानंतर आंबेडकर चौकात निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुफ्ती मेहराज आतार, मुफ्ती याह्या खान, हाफीज तबरेज खान, डॉ.एस.आर.शेख, मेहराज पठाण, फेरोज पठाण, जुनेद आतार, नसीर शेख, जलील आतार, इम्राण पठाण, शादुल्ला आतार, चॉदखा पठाण, शकील आतार, शफीक पठाण, सुल्तान शेख, गौस आतार, ईर्शाद शिकलकर, रियाज शेख, ईस्माईल मनियार, उमर पठाण, आसीफ शेख, खाजा शेख, शमशेर पठाण, हारुन मनियार, वशीम शेख, शहीशां सय्यद, नय्युम कुरेशी, हसन शेख, अमीर शेख, चाँद पठाण, ईलाही शेख, अखील शेख, जावेद सय्यद, सिद्दीकी फैजोद्दीन, मुसा कुरेशी, युसुफ पठाण, इरफान शिकलकर, गौस कुरेशी, सिद्दीकी अपसर, रफीक शिकलकर यांच्यासह गौतम आचार्य, सुहास कांबळे, कमलाकर जाधव, वैभव कांबळेंसह बहुजन बांधवासमवेत हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. निदर्शनाचा शेवट संविधानाची प्रस्तावना सामुहिक वाचनाने झाला.


Comments

Top