लातूर: राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली डेडलाईन आज संपणार आहे. परंतु आज ही रस्त्यांची स्थिती जैसे थे अशीच आहे. लातूर शहरातील बार्शी रोड हा प्रमुख रस्ता आहे. त्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे कालपासून चालू केले आहे. या कामाचा दर्जा हा एकदम निकृष्ठ असल्याचे पाहणी केल्यांनंतर लक्षात येते आहे. लातूर शहर व जिल्हयात रस्त्यांची अवस्था ही जैसे थी! अशीच आहे. लातूरला जोडणारे सर्वच रस्ते हि शेवटची घटका मोजत आहेत. मागिल काही दिवसांमध्ये जिल्ह्यात जवळापास २५ जणांनी आपले प्राण अपघातामध्ये गमावले आहेत. अपघाताची प्रमूख कारण हे रस्त्यांची झालेली दुर्दशा हेच असावे. चंद्रकांत पाटीलांनी १५ डिसेंबर नंतर खड्डा दाखवा नि, १ हजार मिळवा अशी सुतोवाच बांधकाम मंत्र्यानी काढ्ले होते. लातूर जिल्ह्यात एकूण १३ हजार ६४२ किमी लांबीचे रस्ते आहेत त्यापैकी किती रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे? याची काहीच माहिती मिळू शकत नाहिये. रस्तात खड्डे कि खड्ड्यात रस्ते?
Comments