HOME   व्हिडिओ न्यूज

ग्रामदैवत रामलिंगेश्‍वराची पालखी, देखणी शोभायात्रा

रामकथेची सांगता, आज काल्याचे किर्तन, हजारोंचा सहभाग


लातूर: लातूरचे आद्य ग्रामदैवत श्री रामलिंगेश्‍वर मंदिर काळे गल्ली लातूर येथे सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पालखी मिरवणूक व ज्ञानेश्‍वरी ग्रंथराज मिरवणूक सोहळा झाला. या निमित्ताने देखणी शोभायात्रा काढण्यात आली. यात गाव भागातील अनेक भाविक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या विलक्षण होती. मिरवणुकीमध्ये लहान मुलांनी सादर केलेले देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीमध्ये अनेक स्त्रिया डोक्यावर कलश व ज्ञानेश्‍वरी ग्रंथ घेऊन सहभागी झाल्या होत्या. ही शोभायात्रा रामलिंगेश्‍वर मंदिर येथून निघून खडक हनुमान, सुभाष चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, गांधी चौक, औसा हनुमान, सेंट्रल हनुमान मार्गे परत रामलिंगेश्‍वर मंदिरात येऊन सांगता झाली. आज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी १० ते १२ पर्यंत गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या काल्याच्या किर्तनाचा व महाराप्रसादाचा लातूर व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामलिंगेश्‍वर देवस्थान कमेटीचे अध्यक्ष डॉ. पीएस सलगर, सचिव देविदास काळे, नारायण काथवटे, चंद्रकांत धायगुडे, संजय काथवटे, रावसाहेब शिंदे, दत्तू गडदे, नामदेव गडदे, व्यंकट सरवदे, नेताजी गडदे, सिद्धेश्‍वर साबणे, विजय काळे, महेश धायगुडे, अरुण गोयेकर, गुलाब ठाकूर, जगदिश खेत्रे, देविदास घोडके व युवराज देवकत्ते यांनी केले आहे.
(छायाचित्रे - श्याम भट्टड)


Comments

Top