HOME   व्हिडिओ न्यूज

पालकमंत्री वेड्यात काढतात! वंचित आघाडीचा आरोप

भारिप व वंचितने घेतला बेरोजगारांचा नोकरी मेळावा, हजारावर तरुणांचा प्रतिसाद


लातूर: भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या बेरोजगारांच्या नोकरी मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यासाठी हजारवर तरुण तरुणी उपस्थित होते. बेरोजगारांना नोकरीचे व्यासपीठ मिळावे यासाठी हा मेळावा असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी सांगितले.
पालकमंत्री वेड्यात काढतात!
या निमित्ताने बोलताना पलकमंत्र्यांच्या महायज्ञाची आठवण करुन दिली असता, ते लोकांना वेड्यात काढतात. त्यांच्या काकांनी या महायज्ञाला मतदार यज्ञ असे संबोधले. हे सगळे एकाच घरातील आहेत. घी कहां गया तो खिचडीमे असा टोमणाही त्यांनी मारला. या सर्वांनीच आजवर दलित आणि मुस्लिमांना वेड्यात काढून सत्ता उपभोगली आहे असे सूर्यवंशी म्हणाले.


Comments

Top