* लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या बाभळगावात प्रार्थना सभा
* लातुरात २०० ठिकाणी आरोग्य स्शिबिरं, एक हजार डॉक्टरांचं योगदान, किमान ३० हजार रुग्ण घेतील लाभ
* परळीत नव्वद दिवसांपासून नळाला पाणी नाही
* बीडचे बिंदुसरा धरण कोरडेठाक, औरंगाबादेत ते लातूर पाऊस अजूनही नाराज
* लातूरसह अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी इदच्या नमाजनंतर त्याच ठिकाणी जमवला पूरग्रस्तांसाठी निधी
* पालकमंत्र्यांनीही निलंगाच्या इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना दिल्या शुभेच्छा, पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचे केले आवाहन
* पूरग्रस्तांसाठी लातुरकरांनी पाठविले दोन ट्रक जिवनावश्यक साहित्य
* बॉलीवूड कलावंतांनी पूरग्रस्तांची कसलीच दखल घेतली नाही, सगळीकडून टीका
* अभिनेता अक्षयकुमारने मात्र पूरग्रस्तांना केली दोन कोटी रुपयांची मदत
* राज्य मंत्रीमंडळाची आज निवडणुकीपुर्वीची अखेरची बैठक होण्याची शक्यता
* राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचा पक्ष, पवारांना पाठवलेले पत्र सोशल मिडियावर व्हायरल
* ०५ सप्टेंबरपासून जिओची लॅंडलाईन ब्रॉडबॅंड सेवा, १०० एमबीपीएसची गती आणि मोफत कॉलींग मिळणार
* सांगलीत पूर ओसरु लागला पण सगळीकडे चिखल, रोगराईची शक्यता
* कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत पुन्हा अतिवृष्टी होण्याचा इशारा
* कोल्हापुरात ८०० ते १००० कोटी रुपयांचे ऊसाचे नुकसान, शाळांना १६ ऑगस्टपर्यंत सुटी जाहीर
* कोल्हापुरच्या पूरग्रस्त भागात २४ तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश, सगळीकडून टीका
* खासदार संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना केली पाच कोटी रुपयांची मदत
* देशात पूरबळींची संख्या गेली २४० वर
* केरळमधील पूरबळींची संख्या ८३ वर
* बचावकार्य करणारे पाच जवान तुंगभद्रा नदीत वाहून गेले, हेलिकॉप्टरने वाचवले
* राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यंदाचा स्वातंत्र्यदिन पूरग्रस्त भागात साजरा करणार
* पाकव्याप्त काश्मीर भारताचा घटक, तो परत घेणार, प्रकाश जावडेकर यांचं वक्तव्य
* श्रीनगरातील लाल चौकात गृहमंत्री अमित शाह स्वतंत्र्यदिनी करणार तिरंग्याचे ध्वजारोहण
* उत्तराखंडातील चमोलीत पुन्हा ढगफुटी, रस्ते खचले, दरडीही कोसळल्या
* मुंबईवर पुन्हा अतिरेक्यांनी हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हाटसअॅपवर व्हायरल, तपासणीअंती मॉक ड्रील असल्याचे स्पष्ट
* पाकिस्तानच्या सांगण्यावरुन शोभा डे यांनी भारताविरुद्ध लेख लिहिल्याचा आरोप
* आमच्यावर स्थानिक नेत्यांनीच अन्याय केला, अनेक काश्मिरींचं मत
* आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक
* राज्यातील एक हजार नेत्ररोगतज्ज्ञांनी पूरग्रस्तांना दिली सुमारे ३० लाखांची मदत
* शर्मिला ठाकरे मनसेच्या महिला विभागामार्फत करणार पूरग्रस्त भागाचा दौरा
* २० ऑगस्टला चांद्रयान जाणार चंद्राच्या कक्षेत
* झोमॅटो या फूड डिलीव्हरी कंपनीनं केली १०० कर्मचार्यांची कपात
* काश्मिरात अधिक हिंदू असते तर ३७० कलम हटलं नसतं, पी. चिदंबरम यांचा दावा
* कस्तीपटू बबिता फोगाट वडिलांसह दाखल झाली भाजपात
Comments