HOME   व्हिडिओ न्यूज

पूरग्रस्तांना व्हीएस पॅंथर्सची मदत

ब्लॅंकेटस, सॅनिटरी नॅपकीन्स, औषधी जिल्हाधिकारी कार्यालयास सुपूर्त


लातूर: सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना लातूर जिल्ह्यातून मदतीचा ओघ वाढला आहे. परवा सामाजिक संस्थांनी दोन ट्रक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या. काल इदगाहवरील नमाज पठणानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निधी संकलीत केला. आज व्हीएस पॅंथर्सच्या वतीने ब्लॅंकेट्स, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स आणि औषधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली. यावेळी पॅंथर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय टेलर्स संघटनेनंही ३५ हजारांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास सुपूर्त केला.


Comments

Top