HOME   व्हिडिओ न्यूज

उपचारासोबत अन्न अन पाणीही

पोद्दार रुग्णालयात रुग्ण आणि नातलगांची सेवा, युवक कॉंग्रेसचा पुढाकार


लातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त लातूरसह अनेक तालुक्यात २०० ठिकाणी आरोग्य शिबीरं घेतली जात आहेत. यंदा किमान ३० हजार रुग्ण याचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. पोद्दार रुग्णालयात डॉ. अशोक पोद्दार यांनी अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. येथे आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना अन्न आणि पाणी पुरविण्याचा उपक्रम युवक कॉंग्रेसने राबवला. यावेळी एसआर देशमुख,. अभिजित देशमुखही उपस्थित होते. युवक कॉंग्रेसच्या वतीने अन्न आणि पाण्याची सुविधा करण्यात आली होता. यासाठी मोहन सुरवसे यांनी पुढाकार घेतला होता.


Comments

Top