HOME   व्हिडिओ न्यूज

नाना नानी पार्कमध्ये उभे करा शहिदांचे स्मारक

जिल्हाधिकार्‍यांनंतर आयुक्त आणि स्थायीच्या सभापतींना निवेदन


लातूर: लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नाना नानी - आजोबा आजी पार्कमध्ये शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे स्मारक उभारावे अशी मागणी दोन तीन वर्षांपासून जोर धरत आहे. या मागणीसाठी आता महाराष्ट्र स्टुडंट फ़ेडरेशनही आग्रही झाली आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करु असे आश्वासनही त्यांना मिळाले होते. आता या संघटनेने आपला मोर्चा मनपाचे आयुक्त अच्युत हंगे आणि स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांच्याकडे वळवला. संघटनेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने या दोघांनाही निवेदने देऊन आग्रही मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुतळ्यांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. लातूर महानगरपालिका बैठकीत याबाबत निर्णय़ घेऊन तरतूद करेल असे आश्वासन स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र स्टुडंट फ़ेडरेशनचे अध्यक्ष सुरेश जाधव, शाम डोंपले, आकाश गडगळे, प्रमोद जोगदंड, अभय गायकवाड, अजहर शेख, अमोल गेजगे, अजय भांडेकर, गणॆश बेंडगे, महेश मुंडे, राहूल गायकवाड, ऋषिकेश कांबळे, मेघराज सिद्दीकी, ऋषिकेश पेठकर, विठ्ठल लोहकरे, वैभव कांबळे, सचिन झेटे, महेश बिडवे, सतीश वाघमारे, सुनील सातपुते, अजय भताने, कुमार गुंडेराव, अभंग तेलंग, कपिल धानुरे, आनंद बनसोडे, अमोल माळी, प्रशांत डांगे, बिरु झोले, आकाश आलापुरे, लहू भोसले, सुदर्शन माने, कार्तिक मुळे, विशाल ठोंबरे उपस्थित होते.


Comments

Top