लातूर: न्यायालयाने निर्णय देऊनही ८३ रोजंदारी कर्मचार्यांना सेवेत कायम करुन घेतले जात नसल्याने या कर्मचार्यांनी मनपाच्या दारातच आंदोलन सुरु केले आहे. सात टप्प्यात होत असलेल्या या आंदोलनात १४ व १५ रोजी मनपासमोर धरणे, १६ तारखेला निदर्शने, १७ व १८ रोजी धरणे, १९ तारखेला मनपासमोर रास्ता रोको, २० तारखेला सरकारच्या निषेधार्थ सामुदायिक मुंडन, २१ रोजी काळ्या फिती बांधून घंटानाद, सहाव्या टप्प्या २२ रोजी जेलभरो आणि सातव्या टप्प्यात २३ तारखेला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा या कर्मचार्यांनी दिला आहे. ८३ कर्मचार्यांना सेवेत सामावून घ्यावे, या कर्मचार्यांना मागील थकबाकी द्यावी, लाड समितीच्या शिफारसीप्रमाणे ४०८ सफाई कर्मचार्यांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, मनपातील सर्व कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग द्यावा आणि प्रत्येक महिन्याचा पगार पाच तारखेच्या आत करावा असे या कर्मचार्यांचे म्हणणे आहे. मनपाच्या वरिष्ठांनी अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही.
Comments