HOME   व्हिडिओ न्यूज

राज ठाकरे यांची चौकशी, पी चिदंबरम यांना अटक, पारले जी अडचणीत, रेल्वेने पाणी आज बैठक, एमआयएमची १०० जागांची मागणी....२२ ऑगस्ट २०१९


* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन३७३१, तूर ८३७ तर हरभरा पोचला ४५५८ रुपयांवर
* देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी पारले जी जीएसटीमुळे अडचणीत, आठ ते दहा हजार कर्मचार्‍यांची कपात केली जाण्याची शक्यता
* आज राज ठाकरे यांची सक्त वसुली संचालनालयाकडून चौकशी, शांततेचे आवाहन, सबंध महाराष्ट्राचे लक्ष, सर्वत्र सुरक्षा वाढवली
* उद्धव ठाकरे म्हणतात, राज ठाकरेंच्या ईडी चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही
* माजी मंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सीबीआयकडून अटक, २३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* पी. चिदंबरम यांच्यावर सरकार सूड उगवत आहे, प्रियंका गांधी यांचा आरोप
* अभिनेता आमीर खानने पूरग्रस्तांसाठी दिले २५ लाख, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
* अभिनेता अक्षयकुमारच्या ‘मिशन मंगल’ने केली १०० कोटी रुपयांची कमाई
* रेल्वेने पाणी आणण्याबाबत आज लातुरात प्रशासनाची बैठक, सगळ्या शक्यता तपासणार
* लातुरात १२ एकरांवर होणार विभागीय विज्ञान केंद्राची उभारणी
* दुसर्‍या टप्प्यातील भाजपाच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात, महा जनादेश यात्रेचा समारोप होणार पंतप्रधानांच्या उपस्थितीत
* राष्ट्रवादीतच काम करीत राहणार, सेना प्रवेशाचा काही संबंध नाही, छगन भुजबळ यांचा खुलासा
* टीआरपी वाढविण्यासाठी मिडिया माझ्याबद्दल अफवांच्या बातम्या प्रसारित करतोय- छगन भुजबळ
* महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी काही एजन्सीज काम करतात, मी त्यांना पकडलंय, एजन्सीत वकील, सीएंचा समावेश, नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
* भाजपात प्रवेश करण्याबाबत नारायण राणे घेणार १० दिवसात निर्णय नारायण राणे यांनी केले स्पष्ट
* रामराजे नाईक, धनंजय महाडीक, राणा जगजितसिंग पाटील, हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर
* कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित, माजी आमदार रश्मी बागल शिवसेनेत दाखल
* शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दुष्काळ, शेतकरी प्रश्नांवर झाली चर्चा
* विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने प्रकाश आंबेडकरांकडे केली १०० जागांची मागणी
* पूरग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आदित्य ठाकरे करणार प्रयत्न
* ग्राहकांच्या सोयीसाठी बॅंकांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव
* दोन हजारांच्या नोटा बंद होण्याची केवळ अफवा, आरबीआयने केले स्पष्ट
* काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप तयार
* उत्तराखंडात मदतकार्य करणारे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू


Comments

Top