* लातूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेनं दिली मंजुरी, सर्व काही आलबेल असल्याचा महापौरांचा दावा
* सिमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक आणि शहिदांच्या विधवांना मालमत्ता कर माफ करण्याचा विक्रांत गोजमगुंडे यांचा प्रस्ताव सभागृहाकडून मंजूर
* लातूर मनपाच्या या लास्ट बट वन सर्वसाधारण सभेत नेहमीसारखाच गोंधळ, दिसले विरोधी आणि सत्ताधारी सदस्यांचे मधुर संबंध
* लातुरात काल तीनवेळा झाला पाऊस, कमी वेळ पडला पण दमदार पडला
* इडीच्या चौकशीला राज ठाकरे यांनी केलं सहकार्य, साडेआठ तास चौकशी, पुन्हा चौकशी शक्य
* कितीही चौकशा करा, माझे तोंड बंद होणार नाही, बोलतच राहणार, राज ठाकरे यांचे खुले आव्हान
* माजी मंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी, सीबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये काढली रात्र
* कॉंग्रेसनं सत्ताकाळात कधीही सरकारी यंत्रणांवर दबाव आणला नाही, गैरवापर केला नाही, सोनिया गांधी यांची टीका
* महाराष्ट्र शिखर बॅंकेतील घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश, अजित पवारांसह ५० नेते येऊ शकतात अडचणीत
* प्रशासनाकडे काम करुन घेण्याची धमक नाही त्यामुळे राज्याचे वाटोळे झाले, अजित पवार यांची टीका
* फ्रेंच निर्मित राफेल विमानांची तुकडी लवकरच भारतीय लष्करात होणार दाखल
* लवकरच खा. सुप्रिया सुळे करणार सहा जिल्ह्यांचा संवाद दौरा
* मुंबई मनपाची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास अभियंत्यांचे पगार पन्नास टक्क्यांनी कापणार
* मुंबईतील खड्ड्यांचे फोटो राष्ट्रवादी करणार व्हायरल, मुंबई खड्डे का अड्डा नावाची मोहीम
* चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो, तोही चंदामामाचा, चंद्रयानाची आजवर उत्तम आणि नियंत्रित वाटचाल
* पश्चिम बंगालमधील एका ठेल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बनवला चहा, इतरांनाही दिला
* आम्ही अनेकदा चर्चेचा प्रस्ताव दिला पण मोदींनी सहकार्य केले नाही, आता भारताशी चर्चा करायची नाही, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा निर्धार
* शिखर बॅंकेतील घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ५० नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
* पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ
* पंतप्रधान तीन दिवसांच्या परदेश दौर्यावर, आज संयुक्त अरब अमिरात आणि बहारिनला देणार भेट
* डीएस कुलकर्णी यांच्या १३ आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यास न्यायालयाने दिली परवानगी
* भारतीय नेटकरी महिन्याला किमान आठ जीबी डेटा वापरतात
* आता सकाळी सात वाजल्यापासूनच करता येईल आरटीजीएस
* महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता
* जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारताकडून राहूल आवारे याची निवड
Comments