लातूर: लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीच पाणी चोरलं. या कारखान्यांनीच पाणी पळवलं असा जाहीर आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं लातुरात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. साखर कारखान्यांना आपला विरोध नाही. पण पाणी नीट वापरलं जात नाही. सगळा ऊस ठिबक पद्धतीने वाढवला गेला असता तर ही पाणी टंचाई आली नसती. या जिल्ह्यात होणार्या नव्या साखर कारखान्याला आपण विरोध केला होता. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत नव्या कारखान्याला परवानगी मिळू देणार नाही असा निर्धारही निलंगेकर यांनी व्यक्त केला.
Comments