लातूर: शेतकरी व सामान्यांच्या आत्महत्या नापिकीमुळे होत नाहीत तर सावकारांच्या त्रासामुळे होत आहेत असा आरोप करीत काही युवकांनी आज लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी लाक्षणिक उपोषण केले. शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्यांची नोंद सरकार दरबारी आहे. काहींना आर्थिक मदतही मिळाली. पण अनेकांची नोंद सापडत नाही. खाजगी बॅंका आणि सावकारांच्या कर्ज वसुलीवर निर्बंध घालायला हवेत. सावकारीचे परवाने कायमचे बंद करावेत, दहा हजारांपेक्षा अधिकचे व्यवहार ग्राह्य धरु नयेत, खाजगी फायनान्स कंपन्या गुंडांना हाताशी धरुन वसुली करतात, १२ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज लावू नये, सामान्य माणसाला कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी आंदोलक काकासाहेब शिंदे यांनी केले आहे.
Comments