HOME   व्हिडिओ न्यूज

प्रशासनाकडे जमल्या गणेश मूर्ती

२०७ मंडळांचा सहभाग, ५९ मंडळे करणार स्वत: मुर्त्यांचे जतन


लातूर: गणेशोत्सव आणि पाणी टंचाई या अनुषंगाने करण्यात आलेल्या आवाहनाला लातुरात जोरदार प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तपणे निर्णय घेतला, विसर्जन करायचं नाही. मूर्ती जतन करुन ठेवायच्या, प्रशासनाकडे द्यायच्या, मुर्तीकारांनी परत न्यायच्या किंवा स्वत:च्या जबाबदारीवर लातूर बाहेर जाऊन ज्या ठिकाणी पाणी आहे तिथे जाऊन विसर्जन करायच्या असा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. प्रशासनानेही असेच आवाहन केले होते. यानुसार आज मूर्ती येत आहेत. जमा केल्या जात आहेत. ३१७ पैकी २०७ गणेश मंडळं प्रशासनाकडे मुर्त्या देत आहेत. ५९ मंडळे स्वत: मुर्त्यांचं जतन करीत आहेत अशी माहिती उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी दिली. सिद्धेश्वर मंदिराजवळ गणेश मुर्त्या जमा करणे सुरु होते.


Comments

Top