HOME   व्हिडिओ न्यूज

साळुंकेंचे आंदोलन स्टंटबाजी आणि राजकारण- नगराध्यक्ष शिंगाडे

खुर्चीचा लिलाव करण्याऐवजी कर्तृत्वातून खुर्ची मिळवून दाखवावी!


लातूर: शिवसेना नेते अभय साळुंके यांनी आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या खुर्चीचा जाहीर लिलाव केला. हा लिलाव केवळ स्टंटबाजी आहे, राजकारण आहे असा आरोप निलंगाचे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी केला. अभय साळुंके या आंदोलनाची तयारी महिनाभरापासून करीत होते, त्यांनी गावोगावी शेतकरी जागरणाच्या सभा घेतल्या. त्या काळात शिंगाडे बोलले नाहीत. मात्र आज त्यांना ही स्टंटबाजी असल्याची उपरती झाली आहे. अभय साळुंके यांची वृत्ती सगळा जिल्हा जणतो. मागच्या वर्षी आरटीआय कार्यकर्ते भाईकट्टी यांना अमानुष मारहाण केली होती. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हाभर विकास कामे केली. शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. कसलाही राजकीय मुद्दा हाती नसल्यानं अभय साळुंके असे स्टंट करतात. खुर्चीचा लिलाव करण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वातून खुर्ची मिळवून दाखवावी, असली स्टंटबाजी करुन इथले वातावरण खराब करु नये असे आवाहन शिंगाडे यांनी केले आहे.


Comments

Top