HOME   व्हिडिओ न्यूज

शेतकरी आणि कामगारांची एकजूट, मोर्चाने वेधले लक्ष- राजकुमार होळीकर

कामगारांच्या मागण्यांसाठी शेतकरी आणि कामगारांच्या जन महामोर्चात सहभाग


लातूर: शेतकर्‍यांप्रमाणेच कामगारांकडेही सरकार डोळेझाक करीत आहे. आलेला निधी वितरीत न करणे, सक्षम आणि कायमस्वरुपी अधिकार्‍यांची नेमणूक न करणे, कामगारांनी केलेल्या आंदोलनांची आणि मागण्यांची दखल न घेणे, कामगार हिताच्या योजना न राबवणे असे अनेक प्रकार होत आहेत. याचा निषेध म्हणून आज झालेल्या शेतकरी आणि कामगारांच्या जन महामोर्चात सहभागी झाल्याची माहिती कामगार नेते राजकुमार होळीकर यांनी दिली.
लातुरच्या सहय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील प्रभारी राज संपवून पूर्ण वेळ व सक्षम अधिकारी द्यावा, दप्तर दिरंगाई करुन टाळाटाळ करुन हजारो पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्काच्या लाभांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणार्‍या कामगार अधिकारी जेव्ही मिटके यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे किंवा बदली करावी, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील रिक्त कर्मचार्‍यांच्या जागा त्वरीत भराव्यात, औजारे खरेदीचे पाच हजार रुपयांचे अनुदान सर्वच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरसकट देण्यात यावे, घरेलू कामगार कल्याण मंडळ लातूर कार्यालयास त्वरीत निधी देऊन कामगारांना सानुग्रह अनुदान व त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करावी, २०१२ मध्ये बांधकाम कामगार मंडळाने केलेल्या ठरावाप्रमाणे टीबी या गंभीर आजारावर औषधोपचारासाठी त्वरीत अनुदान द्यावे अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.


Comments

Top