HOME   व्हिडिओ न्यूज

वीज तोडणार्‍यांना आसुडाने फोडून काढा, केसचं मी बघतो- सस्तापुरे

शेतकर्‍यांची चेष्टा सुरुच, कर्जमाफीची बोंबाबोंब, त्यात वीजही तोडतात!


लातूर: शेतमालाला भाव नाही, खरेदी केंद्रावर सामान्य शेतकरी टिकत नाही, कर्जमाफी सर्सकट मिळत नाही त्यात शेतीचा वीज पुरवठाही तोडला जातो या पार्श्वभूमीवर आज शेतकरी संघटना मोर्चात सहभागी झाली. शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे मोर्चासमोर आपली भूमिका मांडली. शेतकर्‍यांकडील वीज बिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा बंद केला जात आहे. शिवाय दुष्काळातली बिलेही माथी मारली जात आहेत. उर्जामंत्री शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहेत असा आरोप करीत उर्जामंत्र्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करु असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी सांगितले. या पुढे वीज पुरवठा तोडण्यासाठी येणार्‍य़ा कर्मचार्‍याला चाबकाने फोडून काढा, केसेस झाल्या तर त्याची जबाबदारी मी घेईन असंही ते म्हणाले.


Comments

Top