HOME   व्हिडिओ न्यूज

रामदेवबाबांची चूक शिवसेनेला भोवली

लातूर ग्रामीणच्या उमेदवाराने काहीच केले नाही, पदाधिकार्‍यांचा राडा


लातूर: लातूर ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज प्रचार संपण्याच्या काही तास आधी पत्रकार परिषद घेऊन आपण मॅनेज नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कुलदीप सूर्यवंशी आणि हरी साबदे यांनी त्यांना फैलावर घेतले, जोड्याने मारण्याची भाषा केली. रामदेवबांच्या शिफारशीमुळे सचिन देशमुखांना उमेदवारी मिळाली ही चूक भोवली असा स्पष्ट संकेत यातून मिळाला. रामदेवाबाबांच्या आणखी कोणकोणत्या शिफारशी महाराष्ट्राला भोगाव्या लागतात याचा अंदाज घ्यावा लागणार आहे!


Comments

Top