HOME   व्हिडिओ न्यूज

नाना नानी पार्कमध्ये भगतसिंगांचे स्मारक, मनपाच्या सभेत ठराव मांडा

स्मारकासाठी मी निधी देईन, पालकमंत्री निलंगेकरांचे युवा कार्यकर्त्यांना आश्वासन


लातूर: नाना नानी पार्कमध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचे स्मारक उअभारावे अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट फेडरेशनकडून पाच वर्षांपासून केली जात आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. भूमिका समजाऊन सांगितली. मागणीचं कार्ण आणि महत्व पटवून दिलं. त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत याबाबतचा ठराव मनपाच्या सभेत मांडण्याचे आदेश महापौर सुरेश पवार यांना दिले. मागणीप्रमाणे स्मारक उभारले जाईल याबाबत कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या क्रांतीकारकांचे स्मारक बनवावे ही मागणी बर्‍याच वर्षांपासून केली जाते आहे. लातूर शहरातील तरूण मोठ्या संख्येने एकत्र आले त्यांनी विश्रामगृह येथे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र स्टुडेंट फ़ेडरेशनचे सुरेश जाधव म्हणाले की शहरामध्ये क्रांतीकारकांचे स्मारक तरूणाईसाठी प्रेरणादायी ठरेल. लोकभावनांचा आदर ठेवून पालमंत्र्यांनी लागलीच महापौर सुरेश पवार यांना हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडून तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी सूचना केली. निधीची उपलब्धता मी करून देतो असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी सुरेश जाधव, राहुल गायकवाड, आकाश गडगळे, शाम डोंपले, प्रमोद जोगदंड, अभय गायकवाड, अजहर शेख, अजय भांडेकर, गणेश बेडगे, अमोल गजगे, ऋषिकेश पेटकर, मेहराज सिध्दीकी, सचिन झेटे, वैभव कांबळे, आशुतोष मोरे, अनिकेत भोसले, कपिल मुक्तापुरे, प्रशांत डांगे, आकाश आलापुरे, बबन मुरकटे उपस्थित होते.


Comments

Top