HOME   व्हिडिओ न्यूज

स्वच्छता ठेवा, कचर्‍याचे वर्गीकरण करा, मुलांनी दिली नागरिकांना पत्रं

नगरसेवक अजित कव्हेकरांच्या पुढाकारातून अभिनव उपक्रम


लातूर: विविध शाळातील विद्यार्थ्यांमार्फत नगरसेवक अजित कव्हेकर प्रभाग क्र.१८ मध्ये दोन दिवसांपासून एक अभिनव उपक्रम राबवत आहे. संत पासलेगावर, महाराष्ट्र विद्यालय आणि चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रभागातून रॅली काढली. या रॅलीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी पत्रे स्वत: लिहिली आहेत. हे विद्यार्थी रॅलीतल्या रस्त्यावरील दुकानदार, भेटणारी माणसे यांना ही पत्रे देत होती. या पत्रातून कचरा व्यवस्थापनाचे महत्व विशद करण्यात आले आहे. कचर्‍याबाबत नागरिकांचे विचार बदलायचे आहेत. कचर्‍याकडे कचरा म्हणून न पाहता त्याच्याकडे सोने म्हणून पहावे. कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नागरिकांना दिले जात असून, नागरिकांनी व्यवस्थापन केल्यानंतर महानगरपालिकेला कळवावे. तो कचरा तात्काळ उचलला जाईल, त्याची योग्य ती व्हिलेवाट लावली जाईल. प्लास्टिकमुक्त लातूर यासोबतच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे असे नगरसेवक अजित कव्हेकर यांनी सांगितले. प्रभाग क्र.१८ हा परिसर स्वच्छ व सुंदर बनवू असा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी यावेळी नगरसेविका सरिता राजगिरे, भाग्यश्री शेळके चन्नबसवेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओजी भुसनुरे, प्रा. प्रताप भोसले, प्रा. रवी राजूरकर, प्रा. नशीर शेख, प्रा. दत्तात्रय कौडेवार, महराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे, संजय बिराजदार, संजय गिरी, सुभाष सुडगुले, संजय कदम, प्रा. रघुनाथ वडुलकर, शशीकांत हांडे आदी उपस्थित होते.


Comments

Top