लातूर: लातुरचं कचरा व्यवस्थापन नवीन संस्थेकडं गेल्यापासून काहीफार शिस्त लागली आहे. कुठे रोज, कुठे दोन दिवसाला तर कुठे तीन दिवसाला घंटागाडी येते आणि कचरा घेऊन जाते. कचर्याचं हे व्यवस्थापन नीट व्हावं यासाठी ‘स्वच्छता अॅपप’ही काढण्यात आले आहे. नागरिकांनी कचर्याच्या फोटोसह त्या ठिकाणची माहिती या अॅंपवर टाकायची आणि गाडी येऊन तो कचरा घेऊन जाणार अशी संकल्पना आहे. पण बर्याचदा हे अॅपही नीट चालत नाही. चालले तर आठ आठ दिवस त्यावर केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. तक्रार घेतलीच तर हे गाडीवाले स्वत:च येऊन कचरा पेटवून देतात असे प्रकार सर्रास घडत आहेत. गाडी कधी येईल, कचरा कधी नेईल, नेईल की नाही याचा विश्वास अजूनही नागरिकात नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकच कचरा पेटवून देतात अन मग गाडी येथे हा ग्राऊंडवरचा रिपोर्ट संबंधित कारभार्यांना कळाला तर या व्यवस्थेतला हा दोषही निघून जाईल. कचरा जाळणार्यांवर कारवाईचा बडगा बसला तर अजूनही सुधारणा होऊ शकते.
Comments