HOME   व्हिडिओ न्यूज

भिमा कोरेगाववर मुख्यमंत्री का बोलत नाहीत? धनंजय मुंडे यांचा सवाल

१६ जानेवारीला हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा, विभागीय कार्यालयावर मोर्चाही काढणार


लातूर: भिमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री का बोलत नाहीत? त्यांनी पुढे येऊन जनतेसमोर माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. ते लातुरात पत्रकारांशी बोलत होते. भिमा कोरेगावात याबद्दल राज्य सरकार आणि गृहविभागाला कल्पना होती. हे इनपुट्स मिळूनही सरकारने काळजी घेतली नाही म्हणूनच ही दंगल घडली. घटना घडताच दोषींवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. कोण एकबोटे असो की चारबोटे असो त्यांना शासन केलेच पाहिजे असेही मुंडे म्हणाले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी हल्लाबोल यात्रेचाही तपशील दिला. १६ जानेवारीला तुळजाभवानीचा आशिर्वाद घेऊन हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होईल. ही यात्रा मराठवाड्यातील ०८ जिल्हे आणि २७ तालुक्यातून जाईल. २४ जानेवारीला भोकरदन येथे यात्रेचा समारोप होईल. ०३ फेब्रुवारीला विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. कर्जमाफी, बेरोजगारी आदी प्रश्नांवर आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत असेही ते म्हणाले.


Comments

Top