HOME   व्हिडिओ न्यूज

आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे मनपा स्थायी समितीची बैठक रद्द

‘सभाशास्त्र’ सभापतींनी दिला नवा शब्द! हे शास्त्र या आधी नाही मानले- गोजमगुंडे


लातूर: कालच्या सर्वसाधारण सभेतील अगाध गोंधळ झाल्यानंतर आज बोलावण्यात आलेली स्थायी समितीची बैठकही रद्द झाली. सर्वजण बैठकीला जमले पण आयुक्त अच्युत हंगे यांच्या ऐवजी सह आयुक्त त्र्यंबक कांबळे उपस्थित होते. कांबळे यांना निर्णय घ्यायचा अधिकार नाही असे सांगत ही बैठक घेता येणार नाही असे शैलेश स्वामी यांनी सांगितले. त्यावरुन बराच खल झाला. कालच्या सभेतही सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी सभाशास्त्र हा शब्द प्रयोग केला होता. आजही त्यांनी तो केला. सभाशास्त्राच्या नियमानुसार आजची ही बैठक रद्द करीत आहोत, ही बैठक आयुक्तांच्याच उपस्थितीत व्हायला हवी. पाणी पुरवठा अभियंता आणि आयुक्त हे दोघेही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर गेल्याने हा निर्णय घ्यावा लागला असे गोविंदपूरकर यांनी सांगितले आणि सभा पुढे ढकलली गेली. ही सभा २५ तारखेला दुपारी तीन वाजता आजच्याच विषयांवर होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीत विक्रांत गोजमगुंडे यांनी गोविंदपूरकर यांना चांगलेच फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गोविंदपुरकरांनी सगळ्याच प्रश्नांना अतिशय शांतपणे उत्तरे दिली.
सभाशास्त्रानुसार ही बैठक रद्द करीत असल्याचे सभापती गोविंदपूरकर सांगतात. याच सभापतींनी सभाशास्त्राचा कुठलाच नियम यापूर्वी मानला नव्हता असा आरोप भाजपाचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे यांनी केला. या बैठकीच्या अजेंड्यावर शिवछत्रपती ग्रंथालयामधील अभ्यासिका शुल्कास मान्यता, महापुरुर्शःआंच्या जयंत्या, पुण्यतिथीस अनुदान देणे, पथदिव्यांसाठी लागणार्‍या साहित्याच्या निविदेस मंजुरी देणे, लोकनेते विलासराव देशमुख यांचा पुतळा बसवण्यासाठी आलेल्या निविदेवर विचार विनिमय करुन निर्णय घेणे, कन्सल्टंट पॅनल तयार करण्याच्या कामासाठी आलेल्या निविदांवर निर्णय घेणे आदी सहा विषय होते.


Comments

Top