HOME   व्हिडिओ न्यूज

भाजप सदस्यांना नकोय लोकनेते विलासरावांचा पुतळा- विक्रांत गोजमगुंडे

भाजप सदस्यांच्या दबावाला गोविंदपूरकर बळी पडले, आम्ही चांगल्यांच्या पाठीशी- मनियार


लातूर: नियमावर बोट ठेवत भाजप सदस्यांनी आजची स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात यश मिळवले. लोकनेते विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा विषय आजच्या अजेंड्यावर होता. छुप्या पद्धतीने आयुक्त नसल्याचा बहाणा करीत सभा तहकूब करण्याची मागणी त्यांनी केली. पुतळा होऊ नये हीच त्यांची इच्छा आहे असा आरोप स्थायी समितीचे माजी सभापती, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केला. आयुक्त पूर्वपरवानगीने अनुपस्थित बैठक चालू ठेवावी अशी आमची मागणी होती पण विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न भाजपा सदस्यांकडून होत आहे, त्यामुळे ही सभा तहकूब झाली, या पूर्वी अनेक बैठकांना आयुक्त नव्हते तेव्हा विरोध झाला नाही मग आजच काय साक्षात्कार झाला हे कळत नाही. विकास कामांना गती देणारे आणि नियमाने चालणार्‍या आयुक्तांना हुसकावण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही सर्वजण आयुक्तांच्या पाठीशी आहोत असेही ते म्हणाले.
स्थायी समितीच्या आजच्या बैठकीला आयुक्त हजर नाहीत म्हणून सभा तहकूब करण्यात आली. या पूर्वी अनेकदा आयुक्त नव्हते, कालच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त थोडे कडक वागले, त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न भाजप सदस्यांनी केला, सभापतींवर दबाव आणला, आयुक्त चांगले काम करतात, वसुली होऊ लागलीय, पालिकेला शिस्त लागतेय अशा स्थितीत अधिकार्‍यांशी प्रत्येक अधिकार्‍याला टॉर्चर केले तर एकही अधिकारी जवळ येणार नाही, चांगल्या अधिकार्‍यांच्या पाठीशी आम्ही आहोत असे नगरसेवक राजा मनियार यांनी सांगितले.


Comments

Top