लातूर: मध्यंतरीच्या काळात लातूर महानगरपालिकेला विकासासाठी २६३ कोटी रुपयांचा निधी मिळाला अशा जाहिराती सत्ताधार्यांनी जागोजागी लावल्या होत्या. हे पैसे मनपातच असावेत. शिवाय अमृत योजनेतला अमृत कुंभही मनपातच असावा अशी दिशाभूल चोरट्यांची झाली असावी म्हणूनच त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. कसलाच विकास झाला नाही याचा अर्थ २६३ कोटी आलेच नाहीत. शिवाय अमृत कुंभातलं अमृतही केव्हाच परस्परात वाटून झालं आहे. त्यामुळे चोरट्यांची फसगत झाली अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे माजी सभापती, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे. जी मनपा लातूर शहराला विविध सेवांच्या माध्यमातून शहराला सुरक्षितता देण्यास कटिबद्ध आहे तीच महानगरपालिका असुरक्षित आहे ही खेदाची बाब आहे असे मत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले आहे.
Comments