लातूर: परवा कोर्टाने खडे बोल सुनावल्यानंतर सगळीकडच्या नगरपालिका, महानग्रपालिका जाग्या झाल्या. विना परवाना लावलेले होर्डींग्ज, रस्ता आणि चौकांचे सौंदर्य बिघडवणारी पोस्टर्स आणि तत्सम वस्तू हटवल्या जाऊ लागल्या आहेत. अलीकडे आपली महापालिकाही या कामाकडे लक्ष देऊ लागली आहे. आज गांधी चौक ते गंजगोलाई अशी मोहीम राबवण्यात आली. गांधी चौकात मनपाचे जनतेला आवाहन करणारे होर्डींग हटवून कुणीतरी होर्डींग लावले होते. ते मनपा कर्मचार्यांनी काढून आतले फ्लेक्स फाडले. फ्रेमचे तुकडे करुन गाडीत टाकले आणि ही गाडी पुढच्या मोहीमेसाठी निघून गेली. अशाच प्रकारची मोहीम शिवाजी चौकातही अधून मधून राबवली जाते. त्यामुळे चौकाचौकात दिसणारी होर्डींग्जची गर्दी अलीकडे कमी होऊ लागली आहे.
Comments