HOME   व्हिडिओ न्यूज

नळेगाव कारखान्याच्या कामगारांचं थकित वेतनासाठी उपोषण

२००४ पासूनचा १९ कोटी रुपयांचा पगार बाकी, अवसायक लक्ष देईनात!


लातूर: नळेगावचा जय जवान साखर कारखाना मांजरा परिवाराने चालवायला घ्यावा अशी मागणी अलीकडेच आ. दिलीपराव देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता या कारखान्याचे कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेच्या बाजुला मंडप ठोकून हे कामगार न्यायाची प्रतिक्षा करीत आहेत. या आंदोलनाबाबत या सर्वांनी १५ दिवसांपूर्वी नोटीसही दिली होती पण त्याला दाद मिळाली नाही. २००४ पासूनचा १९ कोटी रुपये एवढा थकलेला पगार द्यावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे. याबाबत न्यायालयाने ०९ कोटी अदा करण्याचे आदेश दिले होते पण तेही पाळले जात नाहीत. कारखाना तातडीने सुरु करावा म्हणजे यातील कामगार आणि परिसरातील शेतकर्‍यांना न्याय मिळेल अशी या आंदोलकांची मागणी आहे. कारखान्याचे मोलॅसिस गेले, साखरही गेली पण पगार झाला नाही. अवसायक शेतकरी आणि कामगारांना वाचवण्यासाठी असतो पण अवसाय्क बॅंकेशी संगनमत करुन कामगारांवर अन्याय करीत आहेत असा आरोप लातूर जिल्हा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डोंगरे यांनी सांगितले. यावेळी सुर्यकांत गुणाले, दत्तात्रत इटबोणे, देवीदास वेळापुरे, बाबूराव तोंडारे, बाबूराव सूर्यवंशी, गुंदेराव चिंदे, अहमद शेख, लिंबाजी शिंदे, महादू मोटेराव उपस्थित होते.


Comments

Top