HOME   व्हिडिओ न्यूज

लातुरात आज दाखवणार ‘पद्मावत’, कडक पोलिस बंदोबस्त!

आजचा पद्मावत थ्री डी, अ‍ॅडव्हान्स बुकींगला जोरदार प्रतिसाद, चित्रपटाबद्दल कुतुहल


लातूर: मागच्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेला ‘पद्मावती’ चित्रपट आज पद्मावत या नावाने आज रिलीज होतो आहे. लातुरच्या रमा बिग सिनेमा, पीव्हीआर आणि इ स्क्वेअर या चित्रपटगृहातून संध्याकाळी सहानंतर प्रत्येकी दोन खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट उद्या २५ तारखेला रिलीज होणार असं सांगण्यात आलं होतं पण आज अचानक त्याची थ्री डी आवृती प्रदर्शित केली जात आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित होत असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत एकाही चित्रपटगृहाने त्याचे पोस्टर लावले नव्हते. काल या तिन्ही चित्रपटगृहांना पोलिस अधिकार्‍यांनी भेटी दिल्या. आजचे सगळे खेळ संध्याकाळी सहानंतर असल्याने दुपारी चार वाजता पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. लातुरातही या चित्रपटाला विरोध होत असून काल सगळ्या चित्रपटगृहांना आंदोलकांनी भेटी देऊन निवेदने सादर केली. चित्रपटाच्या विरोधात मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली होती. त्या धी गांधी चौकात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. २५ तारखेला चित्रपट रिलीज होणार असे सांगून आज २०४ तारखेला कसा काय दाखवला जातोय? असा प्रश्न विचारला असता प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी हा अचानक निर्णय घेण्यात आला असे रमा बिगचे व्यवस्थापक प्रसाद निलंगेकर यांनी सांगितले. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शकांनी सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाच्या अनेक वार्‍या केल्या. चित्रपटात काही कट्सही करण्यात आले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार चित्रपटात काही आक्षेपार्ह आढळल्यास पुन्हा देशभर हलकल्लोळ माजणार आहे.


Comments

Top