HOME   व्हिडिओ न्यूज

सायबर गुन्ह्याचे बळी ठरु नका, आरोपीही होऊ नका

कॉक्सिट कॉलेजात झाली कार्यशाळा, तज्ञांनी केले मार्गदर्शन


लातूर: अलिकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, फसव्या इमेल, एसएमएस यातून आर्थिक लूट केली जाते, सोशल मिडियातून चुकीचे संदेश देऊन समाजात तेढ निर्माण केले जाते, जातीपातींवर चुकीचे भाष्य केले जाते. ही फसवणूक कशी होती, चुकीचे मेसेज कसे ओळखायचे, लॉटरीच्या बहाण्यातून होणारी लूट कशी सोखायची याबद्दल लातूरच्या सायबर पोलिस ठाण्याने कॉक्सिट कॉलेजात एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘ट्रान्स्फॉर्मिंग महाराष्ट्र’ असे नाव या कार्यशाळेला देण्यात आले होते. सायबर गुन्ह्याचे बळी ठरु नका, आरोपीही होऊ नका असे आवाहन यावेळी करण्यात आले. आयसीआयसीआय मुंबईचे शेखर शिंदे, पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, पत्रकार रवींद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या बॅंक खात्याचा तपशील कुणालाही देऊ नका, अनोळखी इमेल पाहू नका, संवेदनशील माहिती पुरवू नका, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पासवर्ड वेळोवेळी बदला, वेगवेगळ्या कामांसाठी एकच पासवर्ड वापरु नका, मोबाईललाही पासवर्ड ठेवा, सोशल मिडियावर अनोळखी व्य्क्तीची फ्रेंडशीप रिक्वेस्ट स्विकारु नका, अनोळखी व्यक्तीने पाटवलेल्या लिंक्स उघडू नका, अप्लीकेशन्सचा वापर केल्यानंतर आठवणीने लॉग आऊट करा, बॅंक खाते, पॅनकार्डची माहिती देऊ नका, लॉटरी, बक्षीस लागल्याचे मेल, कॉल, मेसेज आल्यास दूर्लक्ष करा, ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचा वापर करा, आपले लोकेशन शेअर करु नका, धार्मिक भावना भडकावणारे संदेश, व्हिडिओ, छायाचित्रे, अश्लील साहित्य पोस्ट करु नका, लाईक किंवा शेअरही करु नका असे आवाहन मार्गदर्शकांनी केले. सोशल मिडियातून येणार्‍या चुकीच्या संदेशांमुळे घडणारे अनर्थ पत्रकार रवींद्र जगताप यांनी स्वानुभवातून कथन केले. यावेळी विविध माध्यमातील पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, डीवायएसपी शीलवंत ढवळे, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, नानासाहेब उबाळे, यशपाल कांबळे, रवी गोंदकर, राजेश कंचे, अमर वाघमारे, रियाज सौदागर उपस्थित होते.


Comments

Top