HOME   व्हिडिओ न्यूज

राष्ट्रवादीच्या मोटारसायकलीने केली औसा रोडवर आत्महत्या!

सततच्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन, कार्यकर्त्यांनी ठोकली सरकार विरोधात बोंबाबोंब


लातूर: इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. पेट्रोलने तर ८० चा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाईतही भर पडत आहे. याचा निषेध आज लातूर राष्ट्रवादीच्या वतीने औसा मार्गावर करण्यात आला. एका झाडाला मोटारसायकल दोरीने लटकावण्यात आली. वाढत्या पेट्रोलच्या भावामुळे या मोटारसायकलीने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. या मोटारसायकलीच्या बाजुला बसून काही कार्यकर्ते रडलेसुद्धा! हे सरकार खोटारडे असून जनतेची फसवणूक करीत आहे. सातत्याने इंधनाचे भाव वाढवत आहे. ४६० रुपयांनी मिळणारा गॅस आता सातशे रुपयांच्या वर गेला आहे. हे सरकार जनतेला फसवत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी केला. यावेळी प्रशांत पाटील, बबन भोसले, प्रवीण नाबदे, विशाल आवडे, विशाल विहीरे, विकास लांडगे, अमित पाटील, आशिष भोपणीकर, स्वप्नील दिक्षित, निशांत वाघमारे, आबेद मनियार, राजेश खटके, रामभाऊ सावकार, प्रवीणसिंह थोरात, किरण बडे, सूरज बनसोडे उपस्थित होते.


Comments

Top