लातूर: गंजगोलाईतील अतिक्रमण हटवल्यापासून आजवर १६२ टपरीधारकांचा प्रश्न तसाच आहे. या टपरीधारकांचे पुनर्वसन केले जाईल असे सांगितले जाते पण तशी पावलं उचलली जाताना दिसत नाहीत. हे टपरीधारक त्याकाळी नगरपालिकेला भआडे देत असल्याने पुन्हा त्याच जागी पुनर्वसन करा अशी मागणी करीत आहेत. आज मनपासमोर या टपरीधारकांच्या संघटनेने बेमुदत उपोषण सुरु केले. पुनर्वसन होईपर्यंत त्याच जागी बसू द्या अशी मागणी केली. या टपरीधारकांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना हटवू नये असे न्यायालयाचे आदेश असतानाही ते पाळले गेले नाहीत. १६२ टपरीधारक ज्या जागी होते त्या ठिकाणी सध्या फळवाले, भाजीवाले, निलंगा राईस विकणारे, काही ठिकाणी दुचाकी पार्किंग तर काही ठिकाणी बड्या व्यक्तींच्या चारचाकी गाड्या पार्क केलेल्या असतात असे आंदोलकांचे म्हणणे आहे. पुनर्वसन होईपर्यंत जुन्याच जागी बसू द्यावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान सह आयुक्त त्र्यंबक कांबळे आणि उपायुक्त हर्षल गायकवाड यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या प्रकरणी सोमवारी बैठक घेऊ असे सांगितले तेव्हा उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी जमील नाना शेख, भालचंद्र लाड, निजामोद्दीन, महावीर लाड, दयानंद सावळगी, देवीदास दिवे, राजू रणदिवे, आयुब बागवान, मैनोद्दीन मनियार, इस्माईल मनियार, अमरेश जैन, सय्यद नजीर, शकील पटवेकर, दिनेश रणदिवे, शेख गनी यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.
Comments