HOME   व्हिडिओ न्यूज

घटनेचे रक्षण, जनतेचे रक्षण, त्यासाठीच संविधान बचाव रॅली...

लातुरात धीरज देशमुख यांनी केले नेतृत्व, पंडीतजी अन मोदीत तुलना करण्याचे आवाहन


लातूर: देशाच्या घटनेत बदल केले जातील अशी भिती जनतेच्या मनात आहे, संभ्रम आहे, शंका आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संविधान बचाव रॅलीचं आयोजन केलं. मुंबईसह सर्वत्र अशा रॅलीज काढण्यात आल्या. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार देश चांगल्या पद्धतीनं चालला. आता जनतेच्या मनात भिती आहे. ती घालवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असे जिल्हा परिषद सदस्य आणि लातूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी सांगितले.
आज दुपारी कॉंग्रेस भवन येथून या संविधान बचाव रॅलीला सुरुवात झाली. संविधान बचाव, देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. वाटेत गांधीजींच्या पुतळ्याला वंदन करुन ही रॅली आंबेडकर पार्ककडे रवाना झाली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करण्यात आलं. घटनेनं सर्वांना समान अधिकार दिले आहे. त्या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचा उल्लेख नाही. बाबासाहेबांनी सर्वांसाठी सारखा कायदा दिला. पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि मोदी यांच्यात तुलना करुन पहा. पंडीतजींनी देश कसा चालवला, आज कसा चालतोय याचा विचार करावा. जनतेनं देश तुमच्या हाती दिला आहे तुम्ही कुठल्या पद्धतीनं चालवताय याचाही विचार व्हायला हवा. आज न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घ्यावी लागते, काल लहान मुलांच्या बसवर दगडफेक झाली ही कुठली संस्कृती आहे? सामान्य माणसाच्या मनात भिती तयार केली जाते हे कशासाठी? असाही प्रश्न धीरज देशमुख यांनी विचारला. यावेळी स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, मोईज शेख, लक्ष्मण कांबळे, पृथ्वीराज शिरसाट, दगडू मिटकरी, बीव्ही मोतीपवळे, दगडूसाहेब पडिले, युनूस मोमीन, समद पटेल, कैलास कांबळे, संजय ओहोळ, खाजाबानू बुर्‍हाण, कुणाल वागज, राज क्षिरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.


Comments

Top