HOME   व्हिडिओ न्यूज

लोग आते है, लोग जाते है, हम मोबाईल पे लगे रह जाते है...


लातूर: अशोक हॉटेल चौकातील रहदारी नियंत्रण करणारा हा ट्राफीक हवालदार. सिग्नल बंद असल्यानं रस्त्याच्या मध्यभागी उभा आहे. रहदारी नियंत्रण करता करता मोबाईलमध्ये रममाण झाला. लोक आपापल्या परिनं जात येत राहिले. त्याचं चित्रिकरण करताना एकजण म्हणाला, त्यालाही कुटुंब असेल, त्यालाही अडचणी असतील, त्यालाही महत्वाचे निरोप येत असतील, मग त्या बिचार्‍याने मोबाईल पाहिला तर बिघडले कुठे? खरे आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबावं. एरवी ड्युटी चुकवून एखाद्या ऑटोरिक्षात जाऊन बसतात ना? चहाच्या टपरीवर बसून टाईमपास करतात ना? लोक कसेही जात येत राहतात सावलीला झाडाखाली थांबतात ना? तसं करावं. भर चौकात मध्यभागी उभा राहून, मोबाईल चिवडत लोकांची अडचण करण्यात काय मतलब आहे? शिवाय कंट्रोल नसल्यानं एखादा मोटारसायकलवाला येऊन त्यालाच धडकला तर?


Comments

Top