लातूर: लातूर महानगरपालिका स्थापन होऊन सहा वर्षे होत आली. अजून मनपाच्या अधिकारी-कर्मचार्यांसाठी निवासस्थाने उपलब्ध नाहीत. नवा अधिकारी आला की विश्रामगृहात स्थिरावतो. एखादा फार काळ टिकला तर घर भाड्याने घेतो. तेलंग साहेबही सरस्वती कॉलनीत भाड्यानेच रहायचे. पण आता आयुक्तांसाठीचं घर-सदनिका बांधली जात आहे. बांधकाम अंतिम टप्प्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलिकडच्या रस्त्याने शासकीय कॉलनीकडे निघाल्यानंतर उजव्या बाजुला हे बांधकाम सुरु आहे. त्याच्या अलिकडे तीन मजली इमारत बांधणे सुरु आहे. त्यात सहा सदनिका असतील. त्या उपायुक्त, उप जिल्हाधिकार्यांसाठी प्रस्तावित आहेत असे सांगण्यात आले.
Comments