HOME   व्हिडिओ न्यूज

शहर सुशोभिकरण: शिवाजी चौकात मुर्खपणाचा कळस!

आदर्श अन चांगल्या गोष्टी आम्हाला नकोत, असाच संदेश चाललाय....


लातूर: हा आहे लातुरचा शिवाजी चौक. शहर सुशोभित करण्याच्या मोहिमेत चौक आणि रस्ते दुभाजक वेगवगळ्या संस्था, व्यापारी आणि उद्योजकांना दिले आहेत. त्यांनी हे दुभाजक रंगवायचे, त्यात झाडं लावायची. त्याची निगराणी करायची आणि त्यापोटी आपली जाहिरात करायची असा हा उपक्रम आहे. शिवाजी चौकापासून अंबाजोगाईकडे जाणार्‍या रस्त्यावरील दुभाजक प्रिन्स टाईल्सकडे देण्यात आला आहे. प्रिन्सने झाडेही लावली आहेत. डिव्हायडरवर दोन्ही बाजुंनी प्रिन्सने जाहिरातीही लावल्या आहेत. या जाहिरातींच्या मध्ये काही फलक कोरे सोडले आहेत. कलावंत लातुरकरांनी हे कोरे फलक रंगवले आहेत. या फलकांवर त्यांनी पान खाऊन मारलेल्या पिचकार्‍या अप्रतिम कलाकृतीत मोडतात. कोरे फलक तर रंगवलेच रंगवले. रंगवलेल्या फलकांवरही पिचकार्‍यांनी शेवटचा ‘हात’ मारला आहे. एकूणच चांगल्या आणि आदर्श गोष्टी आम्हाला आवडत नाहीत. आम्ही करायचं ते करतोच असा मेसेज यातून देण्याचा प्रयत्न होत आहे.


Comments

Top