लातूर: स्वच्छ भारत सर्वेक्षण मोहीमेत लातुरला आघाडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. कचरा नियोजनाला यात महत्व असल्याने आणि स्वच्छ प्रभाग स्पर्धेची तयारी करण्याचा दृष्टीकोन यावा यासाठी लातूर मनपाने नगरसेवकांची बैठक कचरा डेपोव आयोजित केली होती. बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी या बैठकीला हजर होते. अनेकांनी आपापली मते मांडली, सूचना केल्या. आयुक्तांनीही अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांचे प्रबोधन केले. नंतर सगळ्यंनी कचरा डेपो पाहिला. आपण पाठवलेल्या कचर्याचं पुढे काय होतं याची माहिती घेतली. कचर्याचं वर्गीकरण, खत निर्मिती कशी होते, खत कसा विकला जातो याची माहिती घेतली. ओला कचरा गावातच मुरावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सव्च्छ भारतचं यापुढचं सर्वेक्षण आठ ते दहा फेब्रुवारी या काळात होणार असल्याची माहिती सतीश शिवणे यांनी दिली.
Comments