HOME   व्हिडिओ न्यूज

कायदेविषयक जनजागृती: वकिलांची मोटारसायकल रॅली

न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, कायदेविषयक सहाय्य


लातूर (आलानेप्र): जनमाणसात कायदेविषयक जनजागृती केली जाते. या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लातुरच्या वकील मंडळींनी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दहा दिवसांच्या या कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय न्याय सेवा प्राधिकरणाच्या वतीने हा १० दिवसांचा जनजागृतीचा कार्यक्रम राबवला जात आहे. जनसामान्यांना कायदा आणि न्यायाबाबत माहिती व्हावी, तात्काळ न्याय आणि तडजोडीने न्याय मिळावा हा या मागचा उद्देश आहे. न्याय प्राधिकरणाने दिलेल्या सुविधांचीही माहिती जनतेला माहिती दिली जाणार आहे. या सोबतच घरोघरी माहिती पत्रके दिली जाणार आहेत. अनेक ठिकाणी बॅनर्स लावली जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतली जाणार आहे. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही रॅली काढली जाणार आहे, सामान्य माणसालाही कायदेविषयक सहाय्य कसे मिळेल याची माहिती दिली जाणार आहे. न्यायापासून कुणीही वंचित राहू नये हा या मागचा उद्देश आहे अशी माहिती न्या. वृषाली जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एसके चौदंते आणि वकील मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी दिली.


Comments

Top