लातूर: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज राज्य महासंघाच्या आदेशानुसार लातूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक, लातूर येथे हजारो शिक्षक एकत्र आले. आपले विचार व्यक्त करून सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुधाकर तेलंग यांना मागण्याचे निवेदन दिले. जेलभरो आंदोलनाला गांधी चौक येथे दुपारी ०१ वा सुरूवात झाली. पोलिस बटालियनच्या व्हॅन तैनात झाल्या होत्या. पोलिसांनी शेकडो शिक्षकांना अटक केली. पोलिसांच्या व्हॅन कमी पडल्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अटक करून घेतली. या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख मागण्या त्यात विनाअनुदानित मुल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालास अनुदानपात्र घोषित करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, ०२ मे २०१२ पासूनच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता द्याव्यात, वाढीव पदांना मान्यता द्यावी. अशा ३२ मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर व पोलिस निरिक्षक गांधी चौक यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकू असा इशारा आंदोलकांनी दिला. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये कडकडीत बंद ठेवून शिक्षक सहभागी झाले होते. या प्रसंगी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव, सचिव प्रा. उदय पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. मारूती सुर्यवंशी, प्रा.शिवराम सुर्यवंशी, प्रा.रामलिंग बिडवे, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. हंसराज बोळेगावे, प्रा. अनिल जाधव, प्रा. दिपक रणदिवे, प्रा.प्रविण खलंग्रे, प्रा. रेशमा पठाण, प्रा. सुवर्णा हालकुडे, प्रा.वैजनाथ जाघव, प्रा. परमेश्वर लवटे, प्रा. संतोष उपासे आदीसह शेकडो प्राध्यापकांनी अटक करून घेतली.
Comments