लातूर: दीपक सूळ. माजी महापौर, विद्यमान विरोधी पक्षनेते. लढवय्ये नगरसेवक. आज त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांना आम्ही बोलतं केलं. आजवर काय केलं, काय करायचं राहिलंय आणि काय करणार आहात या तिन्ही प्रश्नांचा मागोवा त्यांनी आपल्या कथनातून घेतला...
आ. अमित देशमुख मंत्री असावेत, कॅबिनेट असावेत त्यांच्या कारकिर्दीत आपल्याला काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा होती. पण ते काही साध्य झाले नाही. माझ्या महापौरपदाच्या काळात बरीच कामे केली, पाण्यावर काम केले, भीषण पाणी टंचाईला तोंड देऊ शकलो, समाज मंदिरासाठी प्रयत्न करता आले. सुंदर शहर संकल्पनेत डिव्हायडरचे सुशोभिकरण ही कल्पना आमदारांची. आता या कामाला गती आली आहे. महापौरपदाच्या काळात १७५ कोटी रुपयांची कामे करु शकलो. आचारसंहिता लागली होती तेव्हा दीडशे कामांच्या वर्क ऑर्डर जवळ होत्या, अताचे लोक आमच्याच काळातील कामांची उदघाटने करीत आहे. अमृतचे कामही आमच्याच काळातले. त्यांनी उदघाटन करताना आम्हाला आनंदच होतो. आजही महापौरांनी फक्त १५ दिवस सलग दिले तर शहराला चार दिवसाला सहज पाणी मिळू शकते. आमदारांनी विकासाच्या कामाला दिलेली गती आता मनपात भाजपा सत्तेवर असल्याने कमी झाली आहे. लातूरकरांना केंद्रात आणि राज्यांत केवळ गाजर दाखवलं गेलं. आताचे महापौर लातूरचं वाटोळं करतील असं वाटतं. तरीही ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचं काम आम्ही करु अशी आशा दीपक सूळ यांनी व्यक्त केली.
Comments