HOME   व्हिडिओ न्यूज

वाहतूक पोलिसांची बदनामी करणारी दीपिका पदुकोनची जाहिरात हटवा

पोलिस अधिक्षकांना युवकांचे साकडे, कंपनी आणि कलावंतांवर कारवाईची मागणी


लातूर: सध्या टीव्ही, इंटरनेट आणि युट्यूबवर एक जाहिरात फिरते आहे. या जाहिरातीत अभिनेत्री दिपीका पदुकोन वाहतूक पोलिस अधिकारी असून बाकी इतर शिपाईही गणवेशात दिसतात. ही जाहिरात Goibibo या मोबाईल अ‍ॅपची आहे. अधिकारी तिघांकडून पैसे मागते आहे, मध्येच केळी खात आहे, ते तिला पैसे नाहीत म्हणून सांगतात. मग Goibibo या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे मिळवल्याचे हे तिघे एकमेकांचा हवाला देऊन सांगतात. शेवटी दिपिकाही ते अ‍ॅप माझ्याही मोबाईलवर डाऊनलोड करुन दे असं सांगते. या माध्यमातून ती लाच घेत आहे असे दाखवण्यात आले आहे. Goibibo या कंपनीवर, कलाकारांवर आणि वितरकांवर तात्काळ बंदी घालून या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. दिवस-रात्र उन्हात थांबून आपली कर्तव्ये पार पाडणार्‍या पोलीसांची यातून बदनामी होते आहे. यासाठी या जाहिरातीवर बंदी घालावी या मागणीचे निवेदन एम्स प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षकांकडे दिले आहे. यावेळी मनोज जोशी, विशाल राठोड, धिरज अलापूरे, श्रीराम सेलुकर, मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.


Comments

Top