लातूर: आज लातूर-यशवंतपूर रेल्वे सुरु झाली. यशवंतपूर बीदरला थांबून रहायची. ती लातुरपर्यंत वाढवली. मुंबई लातूरला थांबून रहायची ती दिली बिदरला पाठवून. पण हे करताना लोकांच्या सोयीचं काय, काही गैरसोय होते का? याचा विचार झाला नसावा. यशवंतपूर लातुरला आली याचं श्रेय समर्थक मंडळी पालकमंत्र्यांना देतात, खासदारांचे समर्थक खासरादारांना देतात. आज शहरभर दोघांचेही होर्डींग्ज लागले. खासदाराच्या होर्डींगवर पालकमंत्र्यांचा फोटो नाही अन पालकमंत्र्यांच्या होर्डींगवर खासदाराचा फोटो नाही. दोघेही आपण केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचतात. पण वेगवेगळे. या दोघांनी यशवंतपूरसाठी जसे प्रयत्न केले तसे प्रयत्न लातूर-मुंबईसाठी का केले नाहीत? असा प्रश्न जनतेला पडला आहे. यातून घ्यायचा तो बोध जनता घेईलच. पण आज पहिल्या गाडीत जेमतेम १०० लोक होते. बिदरपर्यंत अशीच स्थिती राहील असं बोललं जातंय.
Comments