HOME   व्हिडिओ न्यूज

कुलूप अजूनही तसेच, स्वच्छतेचे काय होणार?

कुलुपकर्ते सचिन मस्केंची दखलच कोणी घेईना, सर्वेक्षण आले जवळ


लातूर: लातुरच्या कचर्‍याचं नियोजन करणार्‍या जनाधार संस्थेनं टेंडर भरताना तीन वर्षांचा ऑडीट रिपोर्ट दिला नाही असा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ त्यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षकाच्या केबिनला कुलूप घातले. त्याला तीन दिवस झाले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपल्याकडे १५ तारखेनंतर स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. इकडे स्वच्छता ऑडीट चालू आहे. गावात स्वच्छता आणि रंगरंगोटी केली जात आहे सगळी स्वच्छतेशी संबंधित कामे गतीमान असताना हे कुलूप कसे चालेल? यामुळे कामे खोळंबणार नाहीत का? या प्रश्नांची दखलच काय तर मस्केंनाही कुणी बोलण्यास तयार नाही. आपणास त्या संस्थेचा ऑडीट रिपोर्ट न दिल्यास महापालिका आणि कचरा डेपोलाही टाळे घालीन असा इशारा मस्के यांनी दिला आहे.


Comments

Top