HOME   व्हिडिओ न्यूज

नगरसेवक मस्केंना सीएचे ऑडीट अमान्य, दोन दिवसात पितळ उघडे पडेल

‘जनाधार’ने टेंडरसोबत भरलेल्या ऑडीट रिपोर्टसाठी स्वच्छता विभागाला घातले होते कुलूप!


लातूर: लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम जनाधार या संस्थेला निविदा प्रक्रियेतून देण्यात आले आहे. या निविदेसोबत जनाधारने ऑडीट रिपोर्ट दिलाच नाही असे नगरसेवक सचिन मस्के यांचे म्हणणे आहे. या रिपोर्टच्या मागणीसाठी मस्के यांनी तीन दिवसांपूर्वी स्वच्छता प्रमुखांच्या दालनाला कुलूप घातले होते. सध्या स्वच्छतेशी संबंधित कामे वेगाने चालू असल्याने या कुलुपाने अडचण केली होती. आज सकाळी मनपाच्या कर्मचार्‍यांनी हे कुलूप तोडून कामकाज सुरु केले. याची माहिती मिळताच मस्के धावत आले. त्यांनी दुसरं कुलूप घालण्याची तयारी केली. पण प्रशासनाने त्यांना ऑडीट रिपोर्टची प्रत दिली. हा रिपोर्ट सीएचा असल्याने त्याला हरकत घेतली. धर्मादाय आयुक्तांना दाखल केली जाणारी टेंडरसोबत दिली जाणारी ऑडीट रिपोर्टची प्रत हवी आहे असा आग्रह मस्के यांनी धरला. मात्र ती मिळाली नाही. मस्के यांनी आणखी काही कागदपत्रे मागवली आहेत. आणखी दोन दिवस प्रतिक्षा आहे, पितळ उघडं पडेल असा इशारा मस्के यांनी दिला.


Comments

Top