HOME   व्हिडिओ न्यूज

दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, खा. गायकवाड यांचा उपक्रम

विराटच्या शतकापेक्षा दिव्यांगांची एक धाव मोठे समाधान देउन जाते- जिल्हाधिकारी


लातूर: खा. सुनील गायकवाड यांने आपले वडील बळीराम गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लातुरच्या क्रीडा संकुलावर दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं होतं. बळीराम गायकवाड फाऊंडेशन आणि मुंबईच्या फिनिक्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचं उदघाटन लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. लातुरचे महापौर सुरेश पवार नगरसेवक शैलेश स्वामी, रागिणी यादव, खासदारांच्या सुविद्य पत्नी, विजय गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, चंद्रकांत कातळे, गिता गौड, प्रवीण अंबुलगेकर, फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी, क्रीडा अधिकारी, क्रीडा प्रेमी यावेळी उपस्थित होते. खा. गायकवाड आणि जिल्हाधिकार्‍यांनी स्पर्धेच्या उदघाटनानिमित्त काही बॉल खेळले. सुनील गायकवाड यांनी टाकलेला चेंडू त्यांच्या पत्नींनी जोरदार फटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील दहा संघांनी भाग घेतला आहे.
अशी स्पर्धा मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच होत आहे. फिनिक्स फाउंडेशन दरवर्षी मुंबईत स्पर्धा घेतात. अपंगांना पंतप्रधानांनी दिव्यांग हा शब्द वापरला आहे. हे विद्यार्थीही क्रिकेट खेळू शकतात. एका सामाजिक भावनेतून य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असे खा. सुनील गायकवाड यांनी सांगितले.
दिव्यांगांनाही एखादे चांगले, वेगळे टॅलेंट असू शकते, विराट कोहलीने श्म्भर रन काढले तर टाळ्या नक्कीच पडतील पण अशा मुलांनी काढलेल्या धावा समाधान देऊन जातात असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.


Comments

Top