लातूर: दहा रुपयांची नाणी सरसकट नाकारली जात आहेत. कुठलेही दुकानदार, छोटे मोठे व्यावसायिक ही नाणी स्विकारायला तयार नाहीत. एवढंच काय तर आपलं बीएसएनएलही ही नाणी घेत नाही. गांधी चौकातल्या कार्यालयात बील कॉऊंटरवर तसा फलक लावण्यात आला आहे. बॅंकेकडे ही नाणी ठेवण्याची सोय नाही त्यामुळे बॅंका घेत घेत नाहीत. बॅंका घेत नाहीत म्हणून आम्हीही घेत नाही असे सांगितले जाते. रिक्षा, भाजी, फळवाले, किराणा दुकानदार ही नाणी आता बंद झाली आहेत असे सांगतात. त्यामुळे महिलाही ही नाणी घेत नाहीत. या नाण्यांबाबतचा गैरसमज दूर व्हावा यासाठी आरबीआयने १४४४० हा टोल फ्री नंबर दिला आहे. य नंबरवर मिस्ड कॉल दिला की तिकडनं फोन येतो आणि दहा रुपयांच्या नाण्याबाबत खुलासा केला जातो. हा खुलासा येथे देत आहोत.
Comments