लातूर: लातूर शहरातील बहुतांश भागातील पथदिवे बंद आहेत. वीज बील थकल्याने महावितरणने कनेक्शन कापले आहे. मधल्या काळात यावर मार्ग काढत असल्याचा, मार्ग निघाल्याची चर्चा झाली पण हेही दिवे फार काळ टिकले नाहीत. याचा निषेध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गांधी चौकातून मेणबत्ती मोर्चा काढला. काहीजण कंदील तर काहीजण टेंभेही घेऊन सहभागी झाले होते. अंधार्या रस्त्यावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते मेणबत्त्यांच्या प्रकाशात खुलून दिसत होते. `दीपक' सूळ यांनी तर डोक्यावरच कंदील घेतला होता. हा मोर्चा येतोय हे कळूनही मनपाने मुख्य प्रवेशद्वार उघडेच ठेवले होते. बाकी इतर मोर्चांच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार लावून घेण्याची परंपरा आहे. या मोर्चेकर्यांनी मनपाच्या पायर्यांवर बसून घोषणा दिल्या. आणलेल्या मेणबत्त्या रांगेत लावून ठेवल्या. या मेणबत्त्यांपैकी एखादीचा तरी प्रकाश महापौरांच्या डोक्यात पडावा अशी प्रार्थना दीपक सूळ यांनी केली. यावेळी मोईज शेख, व्यंकटेश पुरी, पुनीत पाटील, पप्पु देशमुख, सचिन मस्के, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, रत्नदीप अजनीकर, तबरेज तांबोळी, सुमित खंडागळे, उषाताई कांबळे, दत्ता मस्के, कुणाल वागज उपस्थित होते.
Comments